प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२४ : शेतकऱ्यांच्या जीवनात
क्रांतीची पहाट आणणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या प्रांगणात तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दिवाळीनंतर येणाऱ्या या तुळशी सणाला पारंपारिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे हिच परंपरा गोकुळ शुगरने जोपासत तुळशीचे पूजन करत भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन केले, असे गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे
यांनी सांगितले.याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार,उमेश पवार, अभिजीत गुंड यांच्यासह कारखान्यातील विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी शेतकरी उपस्थित होते. यावर्षी कारखान्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता २८०० रुपये जाहीर केलेला आहे आणि जाहीर केल्याप्रमाणे तो पहिल्या पंधरवड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देखील जमा केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह कारखाना कर्मचाऱ्यांत मोठा आनंद आहे.यावर्षी कारखान्याने परिसरातील सर्वच मोकळ्या जागेमध्ये वृक्ष लागवड करून निसर्ग सौंदर्य जोपासले आहे. या बाबीकडे कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी विशेष लक्ष दिले असून त्यांच्यामुळे धोत्रीच्या माळराणावर हा परिसर हिरवाईने नटला आहे.त्यांच्या या दूरदृष्टीमुळे धोत्रीच्या माळरानावर खऱ्या
अर्थाने हरित क्रांती होत आहे असे म्हणायला हरकत नाही. वास्तविक पाहता ज्यावेळी कारखान्याची निर्मिती होत होती त्यावेळी या माळरानावर कारखाना याठिकाणी उभारणे कसे काय शक्य आहे अशा प्रकारची चर्चा होत होती परंतु या सर्व चर्चेला पूर्णविराम देत चेअरमन दत्ता शिंदे यांनी आपल्या
इच्छाशक्तीने हा परिसर समृद्ध केला आहे.