अरे बापरे…! वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

नागपूर :  नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांची तपासणी करत असताना हा प्रकार घडल्याचं समजतंय.

वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारचालकाला चौकात तैनात असलेले वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिदंमवार यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. कारचालक गाडी थांबवत नसल्याचं लक्षात येताच पोलीस हवालदार थेट कारसमोर उभे राहिले. पण तरीही चालकाने कार न थांबविता वाहतूक पोलिसालाच काही मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले. यावेळी त्याने आपल्या कारने अन्य काही गाड्यांनाही धडक मारली. पोलिसाने प्रसंगावधान राखत बोनेटवरून उडी घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावल्याची माहिती आहे.


आकाश चव्हाण असं आरोपीचं नाव असून तो यवतमाळ जिल्ह्यातील केळापूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपुरच्या सक्करदरा चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Leave a Comment