ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती भक्तिभावाने;पाळणा कार्यक्रमाने भाविकांच्या आनंदाला उधाण

 

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट
निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.श्री दत्तांचा जयघोष आणि अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात हजारो भक्तांनी श्रींचे दर्शन घेत मन:शांती करून घेतली.पहाटे ५ वाजता अतिशय मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत
श्रींची काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक मंगळवारी बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेली स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली. यामध्ये रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, भांडुप-मुंबई, बार्शी, भातम्बरे, इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता. या दिंडी व पालखी सोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली होती. पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत दिवसभरात हजारो स्वामीभक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्यावतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिराचे कर्मचारी, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.दिवसभरात श्री दत्त जयंती निमित्त माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त
धोटे,संजय मर्दा,ऍड. अतुलचंद्र वर्मा,हिराबेन कांकरिया,डॉ.प्रकाश कांकरिया, सुहास
पाटील आदींसह विविध मान्यवरांनी श्री
स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.दिवसभरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला होता.दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्यावतीने दत्तजन्म आख्यान, वाचन, व दत्तसंप्रदायिक भजन होऊन सायंकाळी ६ वाजता पाळणा कार्यक्रम पार पडला.त्याचे पूजन चेअरमन इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पार पडला.याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, विजय दास, प्रदीप झपके, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, मोहन जाधव, जयप्रकाश तोळणूरे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब घाटगे, नरसप्पा मस्कले,
रामचंद्र समाणे आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!