ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती ; खा.सुप्रिया सुळे

मुंबई |  विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटीलजी,काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये  म्हटले आहे. या विजयाचा आम्हा सर्वांना आनंद आहे. यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!