ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बहिस्थ अभ्यासक्रमाच्या द्वितीय, तृतीय वर्षासाठी15 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, एमए, एमकॉम या अभ्यासक्रमांच्या द्वितीय आणि तृतीय वर्ष बहिस्थ विभाग प्रवेशासाठी दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राहणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बहिस्थ विभागातील ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग होते, असे विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम, एमए, एमकॉम अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश दिला जाणार आहे. मात्र या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी दोन वर्षात पूर्ण करणे बंधनकारक राहील. त्यासंदर्भाचे हमीपत्र घेऊनच प्रवेश दिला जाणार आहे.

 

विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट देखील करावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर दि. 16 डिसेंबर 2020 पर्यंत निवडलेल्या संबंधित बहिस्थ केंद्र, महाविद्यालय व विद्यापीठ येथे जमा करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!