ध्यास विश्वसार्ह बातमीचा

न्यूझीलंडच्या ‘या’ ऑलराउंडरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती !

वेलिंग्टन : न्यूझीलंड क्रिकेट टीमचा ऑलराउंडर  कॉरी एंडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एंडरसन गेल्या 2 वर्षांच्या अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. न्यूझीलंड क्रिकेटने माझ्यासाठी जे काही केले त्याचे मी कौतुक करतो ” अशी पहिली प्रतिक्रिया एंडरसनने निवृत्तीनंतर क्रिकबझला दिली.

दरम्यान, निवृत्तीनंतर एंडरसनने अमेरिकेत होणाऱ्या टी 20 स्पर्धेसाठी खेळण्याचा निर्णयासोबतच 3 वर्षांचा करार केला असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर एंडरसन या अमेरिका टी 20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

एंडरसनला न्यूझीलंडकडून फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. एंडरसनने 49 एकदिवसीय, 30 टी 20 आणि 13 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 हजार 109, टी 20 मध्ये 485 तर कसोटीध्ये 683 धावा केल्या आहेत. एंडरसन आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना पाकिस्तानविरोधात 2 नोव्हेंबर 2018 ला खेळण्यात आला होता. हा टी 20 सामना होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!