सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास व भैय्या चौक येथील डॉ.कोटणीस स्मारक येथिल त्यांच्या पुतळ्यास महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर सोलापूर महापालिकेच्या कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी.शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जीवनपटावर माहितीपट तयार करण्यात आले असून त्याची माहिती सोलापूर तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी डॉ. कोटणीस स्मारक येथे माहितीपट दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी शिवशंकर यांनी या माहिती पटद्वारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे जीवन चरित्रावर तयार करण्यात आलेले माहितीपट पाहिले तसेच डॉ. द्वारकानाथ कोटणीस येथील स्मारक पर्यटकांसाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी उपायुक्त धनराज पांडे,नगरसचिव तथा कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे, सिव्हिल हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. पानशेवडीकर, विभागीय अधिकारी दिवाणजी, विभागीय अधिकारी तपन डंके,उद्यान अधीक्षक अजय चव्हाण,कोटणीस स्मारक व्यवस्थापक प्रदीप जोशी, मतीन सय्यद ,सुधीर माशाळ, रमेश मोहिते, गणेश चन्ना ,सुरेंद्र शिंदे, प्रविण मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.