---Advertisement---

संजय राऊत पागल झाला ; शिंदे गटाच्या आमदाराची टीका

By team
On: July 14, 2024 10:40 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात नुकतेच विधान परिषदेची निवडणूक झाली असून यात महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप महायुतीवर केल्यावर त्याला आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी देखील प्रत्युत्तर देत राऊतांवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय राऊत हा व्यक्ती पागल झालेला आहे. त्यांच्या विधानाला तुम्ही एवढे महत्त्व देण्याची मुळीच गरज नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असल्याने ते असे बेछूट आरोप करत आहेत. मुळात विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी कोणी 25-25 कोटी रुपये कोणी देईल का, असे जर झाले असते तर सदस्य होण्यासाठी एकाद्या आमदाराला सुमारे 200 ते 300 कोटी रुपये खर्च करावे लागेल, मग कोणी कशाला विधानपरिषदेचे सदस्य होणार आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, मुळात महायुतीच्या नेत्यांनी अन्य पक्षातील लोकांनी ठेवलेले संबंध, वैयक्तिक रिलेशनमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले आहे, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!