ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खुशखबर ! रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास ; ऑस्ट्रेलियासाठी रवाना होण्याची शक्यता

मुंबई | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी संघाबाहेर होता. पंरतु आता भारतीय संघासाठी आणि रोहितच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.

 

बंगळुरु येथे एनसीएमध्ये रोहित शर्मानं फिटनेस चाचणी पास केली आहे.  एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.  १३ तारखेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात रोहित १४ दिवसांच्या विलगीकरणात राहील.

 

ऑक्टोबर महिन्यात ‘आयपीएल’दरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. आता जवळपास एक महिना तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यावर ‘एनसीए’चे प्रमुख राहुल द्रविड, फिजिओ आणि निवड समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची चाचणी झाली. ही फिटनेस चाचणी रोहित शर्मा पास झाला आहे.

 

१४ दिवसांच्या विलगीकरणामुळे रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मावर आणि पुजारावर भारतीय संघाच्या फलंदाजी मदार असेल.  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!