अक्कलकोट,दि.१२ : राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार
यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित कार्यक्रमात पवारांचा जीवनपट दाखवण्यात आला या कार्यक्रमातून कार्यकर्तृत्वाला उजाळा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, दुधनी मार्केट कमिटी संचालक प्रथमेश म्हेत्रे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी शहराध्यक्ष मनोज निकम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश सुरवसे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे यांनी शरद पवार यांचे महाराष्ट्र व देशासाठी चे योगदान नव्या पिढीला व बुद्धिजीवी वर्गाला दाखवण्याच्या हेतूने प्रदेश राष्ट्रवादी च्या आदेशानुसार सदर कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. सकाळी ११ ते २ या वेळेत हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहर तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या उपक्रमातून शरद पवार यांच्या जीवनकार्याचा विस्तृत परिचय झाला. वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेतील निवडक शॉर्ट फिल्म यावेळी दाखवण्यात आल्या. उपस्थितांनी या फिल्मना उत्स्फूर्त दाद दिली.
पवारांचा जीवनपट पाहून अनेकांनी समाधान व्यक्त करत असे बहुआयामी हिमालयाच्या उंचीचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. उपस्थित सर्व मान्यवर व अक्कलकोट तालुकावासियांच्या वतीने जेष्ठ नेते सुरेश सूर्यवंशी यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पवार पंतप्रधान व्हावेत यासाठी स्वामीचरणी साकडे घातले.
यावेळी फत्तेसिंह संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष माणिक बिराजदार,
अरुण जाधव,डॉ. किसन झिपरे, डॉ. शिवराया आडवीतोटे, ऍड.शरद फुटाणे,शंकर व्हनमाने ,विक्रांत पिसे,बसवराज बानेगाव,राम जाधव,शंकर पाटील,नितीन शिंदे,शीतल फुटाणे,श्रीशैल चितली, मुख्याध्यापक भोसले, प्रा. ओमप्रकाश तळेकर, महादेव वाले, प्रा. मनोज जगताप, संदीप सुरवसे, प्रथमेश पवार, विजय माने, अविराज सिध्दे, चंद्रकांत कुंभार, उपस्थित होते. कार्याध्यक्ष माणिक बिराजदार यांनी आभार मानले.