ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुका लवकरच कोरोनामुक्त होणार

 

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने तालुका लवकरच कोरणा मुक्त होण्याचे संकेत मिळत आहेत.या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोरोनाला हरवण्यासाठी ७ डिसेंबर पासून शासनाच्या वतीने माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे.या अभियाना अंतर्गत आरोग्य टीमच्या मदतीने प्रत्येक गावातील नागरिक, व्यापारी,हाॅटेल मालक, दुकानदार,पीठाचे गिरणी मालक,पंक्चर दुकानदार,कटींग दुकानदार व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.या अभियानाला तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवर नागरिक व व्यवसायधारकांनी चांगला प्रतिसाद दिले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे यांनी सांगितले.
या तपासणी अंतर्गत जर का रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आल्यास घरातच विलगीकरण करण्याचा व विलगीकरणातील रुग्णांना वेळीच औषध उपचाराची सोय करण्यात येत असल्याचे गावपातळीवर आरोग्य टीमच्यावतीने सांगण्यात आले.
या अभियानांतर्गत कोरोनामुक्‍तीसाठी लोकचळवळ उभी करुन नागरिका मधून कोरोनाची भिती दूर करून आत्मविश्वास वाढविण्यासाठी या आरोग्य टीमच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.प्रत्येक गावपातळीवर आरोग्य टीमच्या वतीने फलक लावूनही स्वच्छता व सॅनिटायझरचे महत्त्व पटवून देत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम ही आरोग्य टीमच्या वतीने करण्यात येत आहे.जेऊर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत संपूर्ण आरोग्य टीमच्या वतीने हंजगी,समता नगर,जेऊर येथे माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियान राबविण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक काशिनाथ कलाल,आरोग्य सेवक अनिल शिंदे,आरोग्य सेविका ताजबी बिराजदार, चौगुले ए एस,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका व संपूर्ण आरोग्य टीम आदी उपस्थित होते.

अभियानाला नागरिकांचा
चांगला प्रतिसाद

माझे गाव कोरोना मुक्त गाव हे अभियान सुरू झाल्या पासून २ हजार २४६ टेस्टिंग करण्यात आले आहे. त्यापैकी फक्त २८ रुग्ण पाॅजिटीव्ह आढळून आले आहेत.सध्या तालुक्यात या अभियानाला गावपातळीवरील नागरिकामधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.नागरिक स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत आहेत.ही चांगली बाब आहे.

अश्विन करजखेडे,तालुका वैद्यकीय अधिकारी,अक्कलकोट

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!