ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ. शहाज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : कौटगीमठ ; वृक्षारोपणाने केला नववर्षाचा प्रारंभ

 

अक्कलकोट,दि.५ : समाजातील वंचित, दुलऀक्षित, निराधार मुलां-मुलीसाठी कपडे वाटणे,दिवाळी सणात दरवषीऀ फराळ वाटणे, भर उन्हाळ्यात पशुपक्षासह माणसांसाठी पाणपोईची व्यवस्था, महिला सक्षमीकरणाविषयी जनजागृती,सांस्कृतिक कार्यक्रम व वॄक्षारोपणाचे कार्य हे खुप कौतुकास्पद आहे,असे मत नेट-सेटचे जागतिक विक्रमवीर धानय्या कौटगीमठ यांनी वॄक्षारोपणाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. डॉ. शहाज् फाऊंडेशन व डीडी स्केटिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अक्कलकोट येथील नगरपालिका शाळेच्या समोरील प्रमुख मार्गावर ३० झाडे लावण्यात आले. तसेच हे झाडे मोठे होईपर्यंत पाण्याचे व्यवस्था डॉ. शहाज फाऊंडेशन व डीडी स्केटिंग क्लासेस यांच्याकडून करण्यात येईल,असे माहिती कौटगीमठ यांनी दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ.विपुल शहा, डॉ. प्रदीप बिराजदार, सैदप्पा इंगळे,वसिम शेख, धर्मराज अरबाळे, नवनाथ गिरी, काशिनाथ गाडे, सुनिल कट्टीमनी, ताजोद्दीन मोमीन व तसेच स्केटिंग प्रशिणाथीऀ व पालक मंडळी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीडी स्केटिंग क्लासेसचे प्रशिक्षक दयानंद दणूरे यांच्यासह स्केटिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!