ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महा इ – सेवा केंद्र चालक हेच ग्रामविकासाचे वाहक

 

सोलापूर, दि.२६ : शासन योजनांची प्रत्येक्षात लाभ मिळवून देण्यास माहिती व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन व ऑनलाइन फॉर्म भरून देण्याचे कार्य करणारा मुख्य घटक म्हणजे आपले सरकार( ई सेवा) केंद्रचालक होय.
या घटकाला शासन योजनेचे महत्व व सखोल माहिती देण्याकरिता सोलापूर सोशल फौंडेशन आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा लोकमंगल महाविद्यालय वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथे घेण्यात आली.
सदर कार्यशाळेसाठी अध्यक्षस्थानी आमदार
सुभाष देशमुख हे होते तर राज्यस्तरीय प्रशिक्षक शिवाजीराव पवार, प्रशिक्षक अशोक गडकर, भारती पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ई – सेवा केंद्र चालकांनी स्वतः अगोदर शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटात तरुण उद्योजकांना आर्थिक मदत करण्याकरिता शासनाने आत्मनिर्भर भारत योजना असून त्याचा प्रत्येकाला लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र चालकांनी तयार राहावे. मनरेगा, मुद्रा, वृक्ष लागवड, ग्राम विकास निधी, समाजकल्याण च्या विविध योजना, कृषी प्रक्रिया उद्योग योजना, पीएमएजीपी – सीएमएजीपी या व इतर योजना गाव केंद्रबिंदू मानून कार्य करावे याबाबाबत
अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळचे प्रशिक्षक अशोक गडकर यांनी विविध महामंडळ त्यात असलेल्या सवलती, शासनाने केलेल्या आर्थिक तरतुदी, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेडनेट, पॉलिहाऊस,कोल्ड स्टोरेज, बेदाणा प्रोसेसिंग युनिट, मधमाशी पालन, आत्माच्या विविध योजना, वैकक्तिक लाभाच्या योजना, योजनांची माहिती, शासनाचे GR, पीकविमा, श्रावणबाळ, पॅन आधार कार्ड, वैयक्तिक कर्ज- गट कर्ज, महिला आर्थिक विकास मंडळ, बचत गट च्या माध्यमातून महिलांचा विकास योजना, ऑनलाइन फॉर्म भरीत असताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.राज्यस्तरीत प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी केंद चालक यांना स्वतः चे महत्व अधोरेखित केले. आर्थजन करीत समाजसेवा करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे ई सेवा केंद्र असल्याचे यावेळी त्यांना पटवुन दिले गेले.
सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्याभरातून निवडक ई – सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!