ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भंडाऱ्यात १० बालकांच्या दुर्दैवी मृत्यूने राहुल गांधी हळहळले; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई –  महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात रुग्णालयाच्या नवजात बालक दक्षता विभागात लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हळहळ व्यक्त केले आहे.

राहुल गांधी म्हणाले कि,  महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन मी करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.


दरम्यान,  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे नवजात चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यू  झाला आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!