दिल्ली,दि.२६ : कोणताही व्यवसाय करत असताना आपल्यालाला आर्थिक समस्या भेडसावते परंतु ही समस्या भेडसावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत पंधरा लाख अर्ज दाखल झाले आहेत,अशी माहिती केंद्र सरकारने प्रसिद्धीला दिली आहे.सध्या देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. मागच्या काही दिवसात लोकडाऊनमुळे अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या अनेक दुकाने खुली होत आहेत
परंतु ठप्प झालेले व्यवसाय पूर्वपदावर येणे गरजेचे आहे.म्हणून फिरत्या विक्रेत्यांना पुन्हा आपला व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर साडेपाच लाखाहून अधिक अर्जदारांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून या योजनेचा लाभ अनेक फिरते विक्रेत्यांना होत आहे. यासाठी बँक शाखांकडे अथवा संबंधी यंत्रणेकडे अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.