ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

सोलापूर  : वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षाला अडचणीत आणून या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याच्या कारणावरून काळे यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

महापालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्या प्रकरणी राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी काळे यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनीही अहवाल पाठवला होता. पक्षाचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी सोलापुरात येऊन या प्रकरणाची माहिती घेतली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अहवाल पाठवण्यात आला. दरम्यान, प्रदेश भाजपने काळे यांची हकालपट्टी झाल्याचे जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!