मुंबई : आज गुरुवारी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतमध्ये प्रत्येकी २५ पैसे वाढ केली आहे. दरम्यान देशातील महानगरांमध्ये मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत.
मुंबईत पेट्रोल ९१.३२ रुपये असून दिल्लीत पेट्रोल ८४.७० रुपये झाले आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये देखील गुरुवारी पेट्रोलचे दर 84.70 रुपये आणि डिझेलचे 74.88 रुपये प्रति लीटर आहेत.
जागतिक बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आज सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ५२.८१ डॉलर आहे. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ५५.८८ डॉलर झाला आहे.
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
काय आहेत महानगरांतील इंधनाचे दर
दिल्ली- पेट्रोल 84.70 रुपये आणि डिझेल 74.88 रुपये प्रति लीटर
मुंबई- पेट्रोल 91.32 रुपये आणि डिझेल 81.60 रुपये प्रति लीटर
कोलकाता- पेट्रोल 86.15 रुपये आणि डिझेल 78.47 रुपये प्रति लीटर
चेन्नई- पेट्रोल 87.40 रुपये आणि डिझेल 80.19 रुपये प्रति लीटर
बंगळुरू- पेट्रोल 87.56 रुपये आणि डिझेल 79.40 रुपये प्रति लीटर
नोएडा- पेट्रोल 84.45 रुपये आणि डिझेल 75.32 रुपये प्रति लीटर
गुरुग्राम- पेट्रोल 82.87 रुपये आणि डिझेल 75.48 रुपये प्रति लीटर
लखनऊ- पेट्रोल 84.36 रुपये आणि डिझेल 75.24 रुपये प्रति लीटर
पाटणा- पेट्रोल 87.23 रुपये आणि डिझेल 80.02 रुपये प्रति लीटर