दुधनी ,दि.१४ : ( गुरुराज माशाळ ) अक्कलकोट तालुक्यातील दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेतील दुसऱ्या दिवशीचा होम विधी भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
प्रारंभी सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आले. त्यांनतर होमविधीचे मानकरी असलेले वे.मु. ईराय्या पुराणिक व वे.मु. चन्नविर पुराणीक यांनी होम विधीचा कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर मंदिर समितीचे सदस्य गीरमल्लप्पा सावळगी, सिद्धाराम मल्लाड, हनुमंतराव पाटील, मल्लिनाथ पाटील, यांनी होम कुंडात उतरून होम विधीस प्रारंभ केला. कुंभारकन्येचा प्रतिक म्हणून बाजरीचा पेंडीस हिरवा शालू नेसून मणी मंगळसूत्र, जोडवे, हार-दांडा आदी सौभाग्य अलंकार घालून सजविण्यात आले होते.
यावेळी देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, सिद्धाराम येगदी, शिवानंद माड्याळ, मलकाजप्पा अल्लापुर,अतुल मेळकुंदे, निंगणा सोळशे, गिरमल्लप्पा सावळगी, शिवानंद हौदे, रामचंद्र गद्दी, राजू म्हेत्रे (सर) गुरुशांतप्पा परमशेट्टी, गुरुशांत पुराणिक, महानिंगय्या बाहेरमठ, आनंद बाहेरमठ, लक्ष्मीपुत्र कण्णी, बसवराज दोडमनी, शिवराय पगडे, संतोष जोगदे, बाबा टक्कळकी, शिवानंद फुलारी, शरणप्पा मगी, चंद्रकांत बबलाद आदी उपस्थित होते.