ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सकारात्मक सोलापूर घडविण्यात युवकांचे मोठे योगदान – विजय जाधव

 

सोलापूर, दि.१७ : हिराचंद नेमचंद कॉलेज अॉफ कॉमर्स, सोलापूर यांच्या वतीने आयोजित सोलापूर : युवा, शिक्षण आणि वातावरण ह्या विषयावर गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांचे अॉनलाईन व्याख्यान झाले. सोलापूरच्या चार हुतात्मांनी त्यांच्या उमेदीच्या काळात स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन संपूर्ण भारताला क्रांतीची प्रेरणा दिली.

इतिहासात स्वतःचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरायचे असल्यास युवकांनी त्यांच्याकडे असलेल्या शक्तींचा सकारात्मकतेने वापर केल्यास सोलापूरात निश्चित बदल दिसून येईल. येणाऱ्या काळात पर्यावरण संवर्धन आणि रक्षणाचे मोठे कार्य युवकांना करावे लागणार आहे. सोलापूरात प्रचंड सकारात्मकता असून त्याचा सुयोग्य प्रकारे उपयोग करुन सोलापूरच्या विकासात युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असा आशावाद गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.

सोलापूरातच्या विकासाशी निगडित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पित उत्तरे विजय कुंदन जाधव यांनी व्याख्यानोत्तर प्रश्नोत्तराच्या सत्रात दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अमोल कस्तुरे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय दर्शन नागर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वैभवी देशपांडे यांनी केले. अॉनलाईन व्याख्यानात २०५ विद्यार्थी हजर होते, प्राचार्य डॉ.सत्यजित शहा यांचे विषेश सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!