ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खुशखबर ! राज्यातील आरोग्य विभात साडेआठ हजार पदांची मेगा भरती

मुंबई : राज्यातील आरोग्य विभागातील भरतीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रेणेवरील ताण कमी करण्यासाठी आरोग्य विभागात लवकरचं भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कळंब येथील एका खासगी रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी राजेश टोपे बोलत होते. दरम्यान, या भरती संदर्भातील जाहिरात आज (18 जानेवारी) प्रसिद्ध करण्यात येणार असून 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

झिंझर नावाच्या आयटी कंपनीला नोकर भरती प्रक्रिया राबविण्याचे काम देण्यात आले आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदे भरली जातील. यात नर्सेस, वॉर्ड बॉय, कलर्क आणि टेक्निशियनसह क आणि ड वर्गातील पदांचा समावेश आहे. या नोकर भरतीवेळी कोरोना काळात कंत्राटी काम केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार नाही. मात्र कोरोना संकट काळात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने काम केले. त्यांना नियमित नोकरीवर घेणे शक्य नसल्याने आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयाप्रमाणे तसे करणे नियमबाह्य ठरणार आहे. तरीही त्यांना वेगवेगळ्या भरती तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) मधील पदांची भरती करताना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी निवड प्रक्रियेतील नियमात आवश्यक ते बदल केले जातील, असे टोपे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!