मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना सोमवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिस कस्टडी संपल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने त्यांना न्यायालयात हजर केले होते. समीर यांना एका ब्रिटिश ड्रग पेडलरशी संबंध असल्याच्या कारणावरुन अटक झाली आहे.
NCB चा दावा आहे की, समीर खान ड्रग्स सप्लाय करणाऱ्या ग्रपुचे सक्रीय सदस्य आहेत. त्यांच्याकडून ड्रग्स खरेदी विक्री करण्यासाठी पैसे घेतले होते. दरम्यान, NCB ने समीर यांचा मोबाइल जप्त करुन फॉरेंसिक तपासासाठी पाठवला आहे.
समीर यांच्याडून चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे NCB ने 14 जानेवारीला त्यांच्या बांद्रामधील घरासह वर्सोवा, खार, लोखंडवाला, कुर्ला आणि पवई परिसरात रेड मारल्या होत्या. छापेमारीदरम्यान एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले, पण नंतर त्याला सोडण्यात आले. NCB ने या प्रकरणात यापूर्वीच राहिला फर्नीचरवाला, करन सजनानी, शाहिस्ता फर्नीचर वाला आणि रामकुमार तिवारीला अटक केली आहे.