अक्कलकोट दि,२० : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले असुन कल्लहिप्परगे,मिरजगी,हालहळ्ळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.तसेच तालुक्यातील शिवसेनेचे बारा ग्रामपंचायत सदस्याचें बिनविरोध निवड झाले आहे,अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेचे ४५ उमेदवार निवडून आले आहेत ,अशी माहिती तालुकाध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली.जिल्ह्याप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हि पहिलीच ग्रामपंचायत निवडणुक लढविली गेली त्यात त्याना घवघवीत यश मिळाले आहे विजयी उमेदवारांचे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील,शहर प्रमुख योगेश पवार तालुका उपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर ,आनंद बुक्कानुरे सैपन पटेल ,प्रविण घाटगे,युवासेना शहरप्रमुख विनोद मदने,प्रसिद्धीप्रमुख बसवराज बिराजदार खंडु कलाल ,रजाक सय्यद महिबुब शेख, तालुका महिला अघाडी प्रमुख सौ वर्षा चव्हाण शहरप्रमुख वैशाली हावनूर उपप्रमुख ताराबाई कुभांर व शिवसैनिक उपस्थित होते.