---Advertisement---

“दादा, तुम्ही कोरोनाची लस केव्हा घेणार? अजित पवार म्हणाले…

On: January 22, 2021 3:35 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे । देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणााला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अपेक्षेच्या ६४ टक्के लसीकरण झाले, तर मंगळवारी ५० टक्के लक्ष्य साध्य झाले. त्यानंतर बुधवारी पुन्हा यात वाढ होत ही संख्या ६८ टक्के इतकी नोंदली गेली. या साऱ्या प्रकारांना अनुसरून आज पुण्यात पत्रकारांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच एक प्रश्न विचारला. “दादा, तुम्ही करोनाची लस केव्हा घेणार?”, असा सवाल पत्रकारांकडून करण्यात आला. त्यावर अजित पवारांनी लगेच उत्तर दिले.

”आम्हाला परवानगी मिळेल, त्या दिवशी घेऊ. अजून आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस यामध्ये मोडत नाही. ज्यावेळी आदेश येतील, की यांनीही लस घेतली पाहिजे, आम्ही लगेच लस घेऊन तुम्हाला सांगू की मी आज लस घेतली,” असं रोखठोक आणि स्पष्ट उत्तर अजित पवार यांनी दिलं.

“लसीबाबत काही अडचणी येत आहेत. एका सेंटरवर शंभर जणांना लस दिली जाते. तीन दिवसांच्या लसीकरण टप्प्यात केंद्राकडून प्रत्येकाला तारखांची माहिती येत होती. ग्रामीण भागात शंभर पैकी 61 जणांनी लस घेतली. शहरी भागात सुरुवातीला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी मात्र तो कमी झाला. पिंपरी चिंचवडमध्ये तर 27 टक्केच लसीकरण झालं, अशी माहितीही अजित पवारांनी यावेळी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!