ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोहित पवारांचा नकलीपणा ; निलेश राणेंनी पुरावा दाखवत केला हल्लाबोल

 मुंबई : केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्दे करावे, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सातत्याने सरकारची बाजू मांडताना दिसत आहेत. शेतकरी आंदोलनाबाबतही त्यांनी अनेकदा आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचाच आधार घेत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करुन रोहित पवारांवर पलटवार केला आहे.

नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत”, असं म्हणत रोहित पवार यांच्या बारामती अ‌ॅग्रोचा फ्लेक्स निलेश राणे यांनी ट्विट केलाय.


पोस्टरमध्ये काय लिहलंय?

करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे

वर्षभर हमी भावाने खरेदी

शेतकऱ्याला क्रेडीटवर बेबीकॉर्न बियाणे व मिरची रोपे याचा पुरवठा

शुन्य टक्के वाहतूक

विविध पिकांसाठी तज्ञांद्वारे प्लॉट व्हिजीट व मार्गदर्शन

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!