ध्यास विश्वसार्ह बातमीचा

युवकांनी आदर्श समाज उभारणी साठी पुढाकार घ्यावा – डॉ शिवरत्न शेटे

सोलापूर :  येथील जय हिंद फूड बँकेच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन अक्कलकोट रोड एम आय डी सी च्या टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या हॉल मध्ये करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शिवरत्न शेटे ,डॉ नरेंद्र काटीकर, श्री इंद्रजित वर्धन, कारगिल युद्धात सहभागी असणारे फौजी रामचंद्र माशाळे,फौजी गजभाटे सुरेश तमशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जय हिंद फूड बँकेच्या वतीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी बोलताना डॉ शिवरत्न शेटे सरांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन पर व्याख्यानात युवकांचे समाज आणि राष्ट्र उभारणी साठी महत्वाची भूमिका स्पष्ट केली. उत्तम समाजनिर्मिती आज काळाची गरज असून या साठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त करत जय हिंद फूड बँकेच्या कार्याचे कौतुक केले सोबतच कोव्हिड 19 च्या काळातील झालेल्या सेवा हि महत्वाची होती. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट चे डॉ नरेंद्र काटीकर बोलताना म्हणाले की जय हिंद फूड बँकेच्या वतीने गरजू लोकांना पुरवण्यात येणारे अन्नदानाचे कार्य उत्तम चालू असून कार्याचा आलेख असच वाढत राहो .

कार्यक्रम यांनी यशस्वी करण्यासाठी जय हिंद फूड बँकेचे संस्थापक अध्यक्ष सतीश तमशेट्टी, प्रा विक्रमसिंह बायस, सुधीर तमशेट्टी, प्रा.मृदुला कौलगी मोहोळकर, डिंपल जैन, विनय गांगजी, अनिकेत सरवदे, चंद्रकांत गजेली, गजानन यन्नम, शुभम बल्ला, अलोक तंबाके, प्रथमेश रापोल, विपीन कदम, सौरभ करकमकर, राजेश वडीशेरला यांनी प्रयत्न केले.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल बिराजदार यानि केले तर आभार प्रदर्शन डॉ. मोनिका जिंदे यानी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!