सोलापूर: मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळच्या लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयतर्फे कोरोना योद्धांंचा सन्मान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिननिमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमात सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थिटे यांच्या हस्ते कोरोना योद्धांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण पाटील, दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती गुरुनाथ म्हेत्रे, प्राचार्य श्रीधर टेळे, पिरप्पा म्हेत्रे, प्रसाद शेंडगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव श्री म्हेेत्रे म्हणाले,“कोरोनाच्या महामारीत आशा स्वयंसेविकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात जनजागृतीचे मोठे काम केले. ‘आशा’ची त्याग व निष्ठा प्रेरणादायी आहे. स्वत: कोरोना बाधित झाल्यानंतर मृत्यूशी झुंज देऊन परतल्यानंतर लगेच पुन्हा रुग्णसेवेत सक्रीय झालेल्या केतकी कामतकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, आशा स्वयंसेविका सुवर्णा गायकवाड, सुज्ञानी शिंगाडे, सरस्वती लोभे यांनी आरोग्य जागृतीचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कोविड योद्धा पुरस्कराने सन्मानित झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड, कंदलगाव आरोग्य केंद्राच्या डाॅ. संगीता नलावडे, आरोग्य सहाय्यक श्री. धुळम यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.