ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द  करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना असल्यामुळे यावर्षी अर्थसंकल्प पेपर शिवाय असणार आहे. सर्व कॉपी ऑनलाईन दिल्या जाणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सकाळी ११ वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात कोरोना टॅक्स सादर केला जाण्याची शक्यता आहे. कारण कोरोना काळात सरकारने लसीकरण, आर्थिक पॅकेज, उपचारासाठी लागणारी सामग्री यासाठी भरपूर पैसा खर्च केला. याशिवाय आरोग्य विभागातल चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारला पैशांची आवश्यकता लागेल. त्यामुळे कोरोना टॅक्सच्या माध्यमातून हा सर्व पैसा गोळा करुन आणखी जास्त चांगली सुविधा दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!