नेपीडॉ: म्यानमारमध्ये सत्ता पालट होऊन लष्कर सत्ता हाती घेणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. अखेर ही शंका खरी ठरली असून सोमवारी सकाळी म्यानमार लष्कराने आपल्या हाती घेतली आहे. तसेच म्यानमार लष्कराने देशाची नेताआंग सान सू की यांना अटक केली असून म्यानमारमध्ये एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आल्याची घोषणा लष्कराने टीव्हीवर केली. माजी जनरल आणि उपराष्ट्रपती मिंट स्वे यांना कार्यकारी राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लष्कर प्रमुखाचा दर्जाही देण्यात आला आहे.
लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर होणारा विरोध चिरडण्यासाठी रस्त्यांवर सैन्य तैनात करण्यात आले असून फोन लाईन बंद ठेवण्यात आल्या आहेत. याआधी एनएलडी चे प्रवक्ते मयो न्यूट यांनी सांगितले की, राष्ट्रपतीआंग सान सू की आणि पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना लष्कराने सोमवारी सकाळी छापेमारी करून अटक केली आहे. आपल्यालादेखील लवकरच अटक करतील अशी भीती मयो यांनी व्यक्त केली.
म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकीत आंग सू की यांच्या एनएलडी पक्षाला बहुमत मिळाले होते. त्यानंतर आज म्यानमारमध्ये संसदेची बैठक होणार होती. राजधानीसह इतर शहरांमध्येही लष्कर तैनात करण्यात आले आहेत. तर, काही तांत्रिक कारणास्तव वाहिनीवरील कार्यक्रम प्रसारण करण्यास असमर्थ असल्याचे सरकारी वाहिन्यांनी सांगितले आहे.