मुंबईः काल सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर सोने दरात मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याच पाहायला मिळालेत. आज राज्यात सोने प्रतितोळा 490 रुपयांनी महागले असून, चांदीसुद्धा प्रतिकिलो 3200 रुपयांनी महाग झालीय.
देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत.
मुंबईतील सोने-चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48,450 रुपये
24 कॅरेट सोने : 49,450 रुपये
चांदीचे दर : 73000 रुपये (प्रतिकिलो)
पुण्यातील सोने-चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48,450 रुपये
24 कॅरेट सोने : 49,450 रुपये
चांदीचे दर : 73000 रुपये (प्रतिकिलो)
नाशिक सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48,450 रुपये
24 कॅरेट सोने : 49,450 रुपये
चांदीचे दर : 73000 रुपये (प्रतिकिलो)
नागपूर सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48,450 रुपये
24 कॅरेट सोने : 49,450 रुपये
चांदीचे दर : 73000 रुपये (प्रतिकिलो)