ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; तुमच्या शहरातील दर काय?, जाणून घ्या

नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल-डीझेलच्या भावाने उच्चांकी गाठली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही इंधनांच्या किमती अधूनमधून वाढल्या आहेत, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

दरम्यान, दोन दिवसांच्या वाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही. काल दोन्ही इंधनांच्या किमतीत 30 पैसे प्रतिलिटर वाढ झाली होती. यानंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 86.95 रुपये तर डिझेल 77.13 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले.

एका वर्षात पेट्रोल 14 रुपयांनी महागले

गेल्या एका वर्षात पाहिले तर पेट्रोलच्या किमतीत 14 रुपयांपेक्षा जास्त वाढ झालीय. पेट्रोल आणि डिझेलची किंमत सतत वाढत असल्यानं विक्रमी पातळीवर पोहोचलीय. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे महागाईही वाढते. त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होतो.

देशातील बड्या शहरातील पेट्रोल डिझेल दर काय?

दिल्लीत पेट्रोल 86.95 रुपये तर डिझेल 77.13 रुपये प्रतिलिटर आहे.

मुंबईत पेट्रोल 93.49 रुपये तर डिझेल 83.99 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 88.30 रुपये तर डिझेल 80.71 रुपये प्रतिलिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 89.39 रुपये तर डिझेल 82.33 रुपये प्रतिलिटर आहे.

बेंगळुरूमध्ये पेट्रोल 89.85 रुपये तर डिझेल 81.76 रुपये प्रतिलिटर आहे.

नोएडामध्ये पेट्रोल 86.14 रुपये तर डिझेल 77.54 रुपये प्रतिलिटर आहे.

गुरुग्राममध्ये पेट्रोल 85.02 रुपये आणि डिझेल 77.69 रुपये प्रति लिटर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!