ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आम्ही फासे पलटवणार ; रिक्त विधानसभा अध्यक्षपदावर फडणवीसांचे उलथापालथाचे संकेत

मुंबई –  नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय उलथापालथाचे संकेत दिले आहेत. आम्ही फासे पलटवणार, शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

 

भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि राज्यात सगळ्यात कमी आमदार असलेला पक्ष काँग्रेस सरकारला पाठिंबा देत सत्तेत आहे. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असूनही त्याला विरोधी पक्षात राहावं लागलं आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे म्हंटले पडले की, विधानसभा अध्यक्षपदाचे काय करावे? यावर तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. तर काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने सामना अग्रलेखातून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!