पलूस ,दि.१२ : सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद पलूस शाखेच्यावतीने राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या पुरस्कारात सोलापूरच्या मसाप सोलापूर शाखेचे कार्यवाह आणि ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांच्या ‘डोहतळ’ या काव्यसंग्रहाची स्व. ज्ञानेश्वर कोळी स्मृती उत्कृष्ट वाङमय काव्यपुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती मसाप पलूस शाखेच्या उपाध्यक्षा श्रीमती वासंती मेरू यांनी दिली.
या पुरस्काराचे वितरण मंगळवार दि ९ मार्च २०२१ रोजी पलूस येथे होणाऱ्या ३२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात जेष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. असेही वासंती मेरू यांनी सांगितले आहे.कटकधोंड यांनी तळागळातील माणसाच्या जगण्याचे चित्र शब्दबद्ध करत उपेक्षित,शोषित, आणि पीडितांच्या वेदनांचे दर्शन आपल्या काव्यसंग्रहातून घडवले आहे.त्यांच्या
‘कुंपण वेदनांचे’ आणि ‘उन्हे परतून गेल्यावर’ या दोन काव्यसंग्रहानाही साहित्यातील प्रतिष्ठीत आणि नामवंत पुरस्कार यापूर्वी मिळाले आहेत.
कवी कटकधोंड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर,जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.राजेंद्र दास,कवी माधव पवार ,कथाकार राजेंद्र भोसले,कवी गिरीश दुनाखे, वंदना कुलकर्णी,
यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post