ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंदोलनाचा परिणाम: पंजाबमध्ये निवडणुकीत भाजपचा ‘सफाया’

चंडीगड: दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे भाजप विरोधी वातावरण तयार होतांना दिसत आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धक्का बसला आले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळवला आहे. भाजपचा सुपडासाफ झाला. मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत सातपैकी पाच महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. शुजानपूर महापालिकेच्या १५ पैकी ८ वार्डात कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट आणि बठिंडा महापालिकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. बठिंडा पालिकेतील निकाल हा सर्वात आश्चर्यचकित करणारा असून जवळपास ५३ वर्षांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली आहे.

हा निकाल भाजपासाठी खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण भाजपाकडे शहरी मतदारांचा पक्ष म्हणून पाहिलं जात होतं. पण कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शिरोमणी अकाली दलने युती तोडल्यापासून चित्र बदलल्याचं दिसत आहे. १४ फेब्रुवारीला १०९ नगपालिका, नगर पंचायत आणि सात महापालिका निवडणुकीसाठी मतदान झालं. कृषी कायद्यांवरुन आक्रमक आंदोलन सुरु असताना एकूण ७१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!