मुंबई,दि.२९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे.याबाबतची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून लवकरच या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल योगदान योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी मंगेशकर कुटुंबातूनच याची निवड करण्यात आली आहे.