अक्कलकोट, दि.१७ : विक्रांत पिसे यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.पिसे हे गेली काही वर्षे राष्ट्रवादी मध्ये कार्यरत आहेत.संघटनात्मक कौशल्य त्यांच्याकडे आहे.त्यामुळे जिल्हाध्यक्ष साठे यांनी पिसे यांची निवड केली आहे.
जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.यापुढेही आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेला माणूस जोमाने काम करणार असल्याचे पिसे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, शहराध्यक्ष मनोज निकम, नूतन जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, तालुका सरचिटणीस शंकर व्हनमाने आदी
उपस्थित होते.