पुणे: आज सकाळी सकाळी क्रिकेटप्रमिंसाठी आणि पुणेकरांसाठी धक्कादायक अशी घटना घडली आहे. क्रिकेटच्या मैदानावर एका सामन्यादरम्यान फलंदाजाचा मैदानावरच मृत्यू झाला. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील गुरुवारी ही घटना घडली. एका स्पर्धेत गुरुवारी 18 रोजी ओझर आणि जांबूत संघात सामना सुरू होता. तेव्हा फलंदाजीसाठी मैदाना असलेल्या महेश उर्फ बाबू नलावडे हे जागेवर कोसळले. त्यांना तातडीने डॉ. राऊत यांच्याकडे नेण्यात आले. पण तोपर्यंत मृत्यू झाला होता. नलावडे 47 वर्षांचे होते.
सामना सुरू असताना नॉन स्ट्रायकरवर उभे असलेले फलंदाज नलावडे धाव घेण्यासाठी पुढे आले. पण पुन्हा ते मागे आले आणि जमीनीवर बसण्याचा प्रयत्न केला पण ते खाली कोसळले.
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी ओडिसामधील केंद्रपाडा येथे 18 वर्षाच्या क्रिकेटपटूचा मृत्यू झाला होता. तेव्हा केंद्रपाडा जिल्ह्यातील कॉलेजमध्ये एका स्थानिक सामन्यात हृदयविकाराचा धक्का बसल्याने क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. तर मुंबई देखील एका स्पर्धे दरम्यान संदीप चंद्रकांत म्हात्रेचा 36व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते.