ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकरी आंदोलनाचा 85 वा दिवस; आज देशभरात ‘रेलरोको’

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सिमेवर गेल्या 85 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधला गेला नसल्याने आंदोलन कायम आहे. दरम्यान आज गुरुवारी 18 फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा 85 वा दिवस आहे. आज देशभारात चार तासांसाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येत आहे. दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान आंदोलन होत आहे. पंजाबण हरियाणा, बंगाल, बिहार आदींसह विविध राज्यांमध्ये आंदोलन होत आहे.

भारतीय शेतकरी युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

यांनी कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकर्यांनी रेल्वे थांबवण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या (आरपीएसएफ) 20 अतिरिक्त कंपन्या म्हणजेच 20 हजार अतिरिक्त जवान देशभरात तैनात केले आहेत. त्यापैकी बहुतेकांना पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आले आहे. रेल्वे संरक्षण दलाचे डीजी अरुण कुमार यांनी निदर्शकांनी शांततेत निदर्शने करण्याचे आवाहन केले असून ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये.

सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी आग्रही आहेत. भारतीय किसान युनियन (हरियाणा) चे अध्यक्ष गुरनामसिंग चंढूनी यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की त्यांची संघटना शेतकर्‍यांच्या हितासाठी लढा देत आहे आणि नवीन कृषी कायदे परत जात नाही तोपर्यंत ते त्यांच्या घरी परतणार नाहीत. चंढूनी म्हणाले की, देशभरातील पंचायत आणि महापंचायत सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना सांगितले जाईल की केंद्र सरकार सामान्य लोकांचे नसून कॉरपोरेट्सचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!