मुंबई: 2021 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या अर्थात आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव आज गुरुवारी १८ रोजी पार पडला. यात इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा मान दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला मिळाले आहे. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघात ख्रिस मॉरिसला घेण्यासाठी जबरदस्त चुरस झाली. अखेर राजस्थान रॉयल्सने मॉरिसला १६.२५ कोटींत खरेदी केले. ग्लेन मॅक्सवेलसाठीही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने १४.२५ कोटी मोजले आणि तो सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेला.
आयपीएलचा इतिहास
ख्रिस मॉरिस – १६.२५ कोटी ( राजस्थान रॉयल्स २०२१)
युवराज सिंग – १६ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स २०१५)
पॅट कमिन्स १५.५ कोटी ( कोलकाता नाइट रायडर्स, २०२०)
बेन स्टोक्स १४.५ कोटी ( रायझिंग पुणे सुपरजायंट्स २०१७)
ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१)
युवराज सिंग १४ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०१४)
सर्वात महागडे खेळाडू
पॅट कमिन्स – १५.५ कोटी, २०२०
बेन स्टोक्स – १४.५ कोटी, २०१७
ग्लेन मॅक्सवेल – १४.२५ कोटी, २०२१