ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पेट्रोल-डीझेल दरवाढ सुरूच; हे आहेत आजचे दर

मुंबई: गेल्या ११ दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. आज पुन्हा पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३३ पैशांनी वाढले आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला असून प्रतिलीटरमागे ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपये ६२ पैसे आणि डिझेलचा दर ८७ रुपये ६७ पैसे इतका झाला आहे. कोलकातामध्ये पेट्रोलसाठी ९१ रुपये ४१ पैसे तर डिझेलसाठी ८४ रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत.

राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे.

मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्क यांनुसार इंधनाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट राजस्थानमध्ये लागू केला जातो व त्यामागोमाग मध्य प्रदेशचा क्रमांक आहे. मध्य प्रदेशात पेट्रोलवर लिटरमागे ३३ टक्के अधिक ४.५ रुपये इतका कर आणि १ टक्का अधिभार असून, डिझेलवर प्रति लिटर २३ टक्के अधिक ३ रुपये इतका कर आणि १ टक्का अधिभार लावला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!