ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटीलांशी संजय राऊतांची गळाभेट; एकच चर्चा

पुणे: राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका मोठी आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीही आहे. राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक म्हणून कॉंग्रेस सरकारच्या काळात मंत्री असलेले मात्र सध्या भाजपात असलेले हर्षवर्धन पाटील याची ओळख आहे. मात्र इंदापूर दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत यांनी हर्षवर्धन पाटील यांची गळाभेट घेतल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत इंदापूरच्या जागा वाटपावर वाद देखील झाले होते. २०१४ मध्ये आघाडी झालेली झाली नसल्याने राष्ट्रवादीकडून विद्यमान राज्यमंत्री पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जाणारे दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी हर्षवर्धन  पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीत मोठे मतभेद झाले.

अकोले येथे आज रविवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी सहकारमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची गळाभेट झाल्याने इंदापूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या भेटीवर हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टीकरण देत या भेटीमध्ये कोणताही राजकीय उद्देश नसून तालुक्यात आलेल्या पाहुण्यांची गळाभेट घेऊन स्वागत करणे ही परंपरा असल्याने यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपत प्रवेश केला. भाजपकडून निवडणूक लढविली होती. यात त्यांचा पराभव झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!