मुुंबई: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात संचार बंदी लागू झाली असून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले आहे. आठवडे बाजर देखील बंद करण्यात आले आहे. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर करोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा 1 मार्चपासून लॉकडाउन करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर केले आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलविली आहे.
मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकार्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे मुंबईतील स्थितीचा आढावा घेणार आहेत.
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.