ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये महावितरणचा मनमानी कारभार,तक्रार देऊनही कोणीच दखल घेईना !

 

अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील दरी वस्ती येथील विद्युत रोहित्र गेल्या आठ दिवसापासून जळाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीला तक्रार केली तरीदेखील विद्युत रोहीत्र नादुरुस्त राहिलेला आहे.यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड हाल होत आहेत.गेल्या चार महिन्यांपासून आस्मानी संकट आणि आता लाईट उपलब्ध नसल्याने सुलतानी संकट शेतकर्‍यांसमोर उभे राहिले आहे. गेल्या आठवडाभरापासून दरी वस्ती येथील विद्युत रोहीत्र जळाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरू लागले आहे. यंदा जास्त पावसामुळे संपूर्ण खरीप पीक वाया गेले आहे तसेच कांद्याचे रोप देखील जास्त पावसामुळे जळून गेली आहेत. त्यातून शेतकरी कसा बसा सावरत असतानाच आता विद्युत रोहीत्र जळाल्यामुळे दरी वस्ती येथील शेतकऱ्यांना पाणी देणे जिकिरीचे होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याच्या रुपांना व इतर पिकांना घागरीने पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाप खाऊ देईना आणि आई भीक मागू देईना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.त्यामुळे दरी वस्ती येथील विद्युत रोहीत्र लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

जादा क्षमतेचा विद्युत
रोहित्र बसवा

दरी वस्ती येथील विद्युत रोहीत्र हे कमी क्षमतेचे असल्यामुळे वारंवार यामध्ये बिघाड होत आहे आम्ही वारंवार नवीन ज्यादा विद्युत रोहीत्राची मागणी केली असून विद्युत वितरण कंपनी याबाबत उदासीन आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आम्हाला लवकरात लवकर नवीन जादा रोहीत्र बसून द्यावे अशी मागणी आहे.

सौदागर खोडवे,
शेतकरी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!