सोलापूर : सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
सोलापूर ते विजापूर दरम्यान ११० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहे. हा रस्ता चौपदरी आहे. पण या मार्गावर २५.५४ किमीचा रस्ता केवळ १८ तासांत तयार करण्याचा विक्रम संबंधित ठेकेदार कंपनीने केला आहे. यासाठी ५०० मजूरांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदार कंपनीचं आणि ५०० कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सोलापूर ते विजापूर या महामार्गावार ११० किमीचं काम सुरू आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता चौपदरी असून दळणवळाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर ठरणार आहे. याच रस्त्यावरील २५.५४ किलोमीटर लांबीचा एक पदरी रस्ता अवघ्या १८ तासात तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाची नोंद लिम्बा बुक ऑफ रिकॉर्डमध्ये केली जाणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.