ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जि.प सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते मुस्लिम समाज मंदिरचे भूमिपूजन

अक्कलकोट,दि २८ : जिल्हा परिषद सोलापूर बांधकाम विभाग व जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या जि.प सेस फंडातून शिरवळवाडी येथील मुस्लिम समाज मंदिर बांधण्यासाठी ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.या कामाचे भूमिपूजन वागदरी गटाचे जि. प सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बजाबाई घोदे हे होते.

यावेळी शंकर घोदे , हणमंत घोदे , प्रकाश घोदे , धान्यया स्वामी , अब्दुल होटगी, अकबर कुरणे ,उस्मान होटगी ,वजीर कालेशीलार , महंमद शेख , सलीम होटगी , शरणप्पा घोदे , संतोष घोदे ,रमेश चिडगुंपे , अलाउद्दीन शेख व इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदर कामासाठी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जि.प बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे सहकार्य लाभले,असे तानवडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!