ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जळगावमधील आशादीप वसतिगृहात ‘तो’ प्रकार घडलाच नाही

मुंबईः जळगाव शहरातील आशादीप वसतिगृहातील तरुणींना नग्न करून नृत्य करायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकाराचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. विधीमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. दरम्यान गृहमंत्र्यांनी यासाठी चौकशी समिती नेमली होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकार्‍यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी महिलांचं वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचे सांगत, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती दिली.

वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकार्‍यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली. महिलांचं वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकार्‍यांन दिला असून तो मी पटलावर ठेवतो, असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!