देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे कारोना प्रतिबंधक लसिकरण देखील देशभरात सुरु आहे. लसिकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे, यात जेष्ठ नागरिकांनाही लस दिली जात आहे. आज शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल गुरुवारी 17 हजार रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत देशभरात 13 लाख 88 हजार 170 नागरिकांना करोना लस देण्यात आली आहे. आतापर्यत 1 कोटी 80 लाख 5 हजार 503 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत एकूण 16 हजार 838 नवे करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील आत्तापर्यंत करोना संक्रमित रुग्णांची संख्या 1 कोटी 11 लाख 73 हजार 761 वर पोहचली आहे. याच 24 तासांत जवळपास 113 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 57 हजार 548 जणांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे.
24 तासांत 13 हजार 819 रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत देशात तब्बल 1 कोटी 08 लाख 39 हजार 894 रुग्ण बरे झाले आहेत.