ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विकासाच्या माध्यमातून ऋण फेडण्याचा प्रयत्न करणार, चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांचा सत्कार

अक्कलकोट, दि. ८ : चपळगावच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे.विकासाच्या माध्यमातून ते ऋण निश्चितच फेडण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही नूतन सरपंच उमेश पाटील यांनी दिली. चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील पाटील फार्म हाऊस येथे सोलापूर, अक्कलकोट, उमरगा या परिसरातील खत दुकानदार, बी-बियाणे विक्रेते व मित्रपरिवार यांच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

चपळगावची जनता नेहमी विकासाच्या पाठीशी राहीलेली आहे. म्हणूनच इतक्या मोठ्या मताधिक्याने भरभरून आमच्या पॅनेलला जनतेने स्वीकारले आहे.विकासाची संकल्पना यशस्वीपणे राबवून गावाचा कायापालट करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी वनभोजन आणि हुरडा पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते. सर्व खत दुकानदार व बी-बियाणे विक्रेत्यांच्यावतीने सरपंच पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शितलभाई तांबोळी,सुरेश शहा,अशित शहा, अजित पाटील, प्रवीण हेले, आप्पासाहेब पाटील,चंद्रशेखर पाटील, एम.व्ही जाधव, महेश पाटील, श्रीधर माने, मोहन केंगार, लक्ष्मीकांत माणिकवार,सतीश पटणे,निलेश गावसाने,विठ्ठल गाढवे, धनेश कडते, राहुल गुंड,सुभाष नन्ना,दरेप्पा उन्नद, अप्पू सिंदखेडे, शशिकांत लादे,सदानंद भोसले, कोंडीबा भोसले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!