अक्कलकोट, दि.१० : सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुवार दि.
११ मार्च माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिरातील पूजा विधि अभिषेक बंदच आहेत.प्रशासनाच्या सूचनेनुसार महाशिवरात्री रोजी भाविकांना ठराविक अंतराने दर्शनास सोडण्यात येईल.तरी भाविकांनी मंदिरात आल्यानंतर ठराविक अंतराने सुरक्षितपणे दर्शन घेऊन माघारी जावे,असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरातील दिनचर्येत व स्वामींच्या नित्योपचारात बदल करण्यात आले असून सालाबादप्रमाणे सकाळी साडेअकरा वाजता नित्यनेमाने होणारी नैवेद्य आरती व रात्रीची शेजारती तसेच दर गुरुवारी रात्री आठ वाजता होणारा पालखी सोहळा महाशिवरात्रीमुळे होणार नाही. रात्री दहा ते बारा या वेळेत महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री बारा वाजता श्रींची आरती होईल,याची स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी, अशी माहीती इंगळे यांनी दिली.