मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयी राज श्रॉफ यांची अंधेरी पूर्व येथील कॅलोडोनिया बिल्डिंगमधील मालमत्ता ईडीने संपत्ती जप्त केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची ३५ कोटी ४८ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई ईडीने डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे.
पंजाब नॅशनल बँकेची डीएचएफएलकडून ३ हजार ६८८ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. या कंपनीची येस बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. येस बँकेकडून तब्बल ३ हजार ७०० कोटी रुपयांचा शॉर्ट-टर्म डिबेंचर एप्रिल २०१८ला डीएचएफएलमध्ये गुंतवण्यात आले होते. यासाठी वाधवान बंधूंकडून बँकेचे प्रमुख राणा कपूर यांना ६०० कोटी रुपयांची रक्कम मोबदला म्हणून देण्यात आल्याचे सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे.