ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंचनामे झाले पण मदतच मिळाली नाही ! चपळगाव भागात पीक विमा कंपनीचा सावळा गोंधळ

अक्कलकोट, दि.२६ : पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही,अशी स्थिती पीक विम्याच्या बाबतीत चपळगाव भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.यासाठी आता शेतकऱ्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले असून नुकसान भरपाई त्वरित द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने खरीपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. चपळगाव मंडलात सर्वाधिक पाऊस पडला अन् खरीप पिकांचे नुकसान झाले.याबाबत भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जिल्हा कृषी अधिकारी जयवंत कवडे व तालूका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर यांना निवेदन दिले.यावेळी त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे.

यावेळी कृषी उपसंचालक रविंद्र माने, कृषी अधिकारी रामचंद्र माळी, सिध्दाराम भंडारकवठे, शशीकांत लादे, सदानंद भोसले, प्रशांत पाटील, खंडू कोरे, शंभूलिंग अकतनाळ आदी उपस्थित होते. चपळगाव भागातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झटणार असल्याचे सरपंच उमेश पाटील यांनी सांगितले. सदरच्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री व पीक विमा कंपनीस पाठवण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!